Akshay Kumar : AI, डीपफेकविरोधात अक्षय कुमार कोर्टात, हक्कांसाठी याचिका
Continues below advertisement
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी आता त्यांच्या व्यक्तिमत्व हक्कांच्या (Personality Rights) संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. सोशल मीडियावर डीपफेक प्रतिमा अनधिकृतपणे तयार करणे किंवा अपलोड करणे हे केवळ व्यक्तिमत्व हक्कांचे गंभीर उल्लंघन नाही, तर सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचेही उल्लंघन आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते. एआय (AI) आणि डीपफेक (Deepfake) फोटो किंवा व्हिडिओ परवानगीशिवाय तयार करून त्याचा गैरवापर करण्याविरोधात ही याचिका आहे. यापूर्वी, न्यायालयाने अशाच प्रकरणांमध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) आणि अभिनेते सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांच्या हक्कांना अंतरिम संरक्षण दिले होते, ज्यामुळे या कायदेशीर लढाईला एक नवीन दिशा मिळाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement