Akola Farmers Clashes : सावकाराची मुजोरी, शेतीच्या वादातून थेट शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर...
Akola Farmers Clashes : सावकाराची मुजोरी, शेतीच्या वादातून थेट शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर...
अकोला: अकोला जिल्ह्यात सध्या पोलिसांचा धाक उरला की नाहीय?, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक घटना घडतायेत. अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला वेशीवर टांगणारा एक व्हिडिओ सध्या 'सोशल मीडिया'वर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अकोला (Akola News) जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा गावातला आहेत. सावकाराला शेतीचा (Farmer) ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलाय. 17 मे रोजीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Savkar goons attack on Farmer)
मनब्दा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरुन वाद (Farm Land Dispute) सुरु आहेत. हा वाद सध्या न्यायालयात असताना शेळके यांनी शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबीयांवर सावकार शेळके आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला चढवला. यात संदीप गतमने (Sandeep Gatmane) याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेय. तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये सावकारखसह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.