Ajit Pawar Pani Puri : पुण्यात अजित पवार यांनी मारला भेळ, पाणीपुरीवर ताव
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या पुणे दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्यासोबत राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल होण्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसरीकडे त्यांचा एक वेगळा अंदाजही पाहायला मिळाला. 'सार्वजनिक कार्यक्रमात अनेक जण फोटो काढतात, त्यामुळे कुणी गुन्हेगाराशी संबंधित होत नाही', असं म्हणत अजित पवार यांनी या वादावर थेट भाष्य केलं. याच पुणे दौऱ्यावर असताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भेळ आणि पाणीपुरीचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जमलेल्या लोकांशी संवाद साधताना एका महिलेनं त्यांच्या हातात भोपळा आणि शेवग्याच्या शेंगांची पिशवी दिली. या अनौपचारिक भेटीगाठींमुळे दादा काही क्षण कामाच्या ताणातून विरंगुळा घेताना दिसले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement