एक्स्प्लोर
Maharashtra Olympic Association : ऑलिंपिक असोसिएशनचा तिढा सुटला, अजित पवार अध्यक्ष, मोहोळ उपाध्यक्ष
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (Maharashtra Olympic Association) अध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून अजित पवार (Ajit Pawar) अध्यक्ष तर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) वरिष्ठ उपाध्यक्ष होणार आहेत. 'अजित पवारांना अध्यक्षपद आणि वरिष्ठ उपाध्यक्षपद मुरलीधर मोहोळ यांना देण्याचं निश्चित झालं आहे,' असं सूत्रांनी स्पष्ट केलं. शनिवारी रात्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण कार्यकारिणी निवडण्याचे सर्वाधिकार अजित पवारांना देण्यात आले आहेत. खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा तोडगा निघाला. आज दुपारी अजित पवार नवीन कार्यकारिणी आणि चार उपाध्यक्षांची नावे जाहीर करणार आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















