Ahilyanagar Protest | अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण शांतता, 200 जणांवर गुन्हा, 39 ताब्यात
Continues below advertisement
अहिल्यानगर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. काल झालेल्या दगडफेकी प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. रास्तारोको करून जमावाने केलेल्या दगडफेकीत सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 39 जणांना ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगरच्या कोटला परिसरातील रस्त्यावर 'I Love Mohammad' अशी रांगोळी काढण्यात आल्याचा आरोप करत आंदोलकांनी अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी काही आंदोलकांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना दोन वेळा लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, जमावाने तोडफोड आणि रिक्षाच्या काचा फोडल्याचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. कालच्या राड्यानंतर आज परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement