एक्स्प्लोर
Agrarian Crisis: ‘उत्पन्न ९० टक्क्यांनी घटलं’, Gondia मध्ये पावसानंतर रोगराईनं शेतकरी हवालदिल
गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि आता पिकांवर आलेल्या रोगराईमुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे. ‘रोग किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून जो शेतकऱ्यांचा उत्पन्न आहे तो नव्वद टक्क्यांनी कमी झालेला आहे,’ असं 'एबीपी माझा'च्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कापणीला येणाऱ्या धान पिकावर मावा आणि तुडतुड्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, शेतकऱ्यांच्या हातात केवळ दहा टक्के उत्पन्न येणार आहे. या नुकसानीमुळे शेतीसाठी लागलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















