Sharad Pawar on NCP : शरद पवारांच्या वक्तव्यावर Aditi Tatkare Chhagan Bhujbal म्हणतात...
Sharad Pawar on NCP : शरद पवारांच्या वक्तव्यावर Aditi Tatkare Chhagan Bhujbal म्हणतात...
"भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. दोन्ही राष्ट्रवादींनी भविष्यात एकत्र यायचं की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवायचं आहे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं. यावर माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ काय काय म्हणाले?
छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवलाय. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा मी व्यक्त करतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे, पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढलेत, त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे असं वाटत नाही.




















