Mahesh Kothare On BJP : महेश कोठारेंचं भाजप प्रेम; Sanjay Raut यांचा कोठारेंवर थेट निशाणा
Continues below advertisement
ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी आपण पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आणि भाजपचे (BJP) भक्त असल्याची जाहीर कबुली दिल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. 'तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीत, तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल', असा खोचक टोला शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. कोठारे यांनी एका कार्यक्रमात 'मी मोदीजींचा भक्त आहे आणि येत्या काळात मुंबईवर कमळ फुलेल', असे विधान केले होते. यावर भाजपने राऊतांना प्रत्युत्तर दिले; 'तात्या विंचू' हा खलनायक होता आणि आमच्यासोबत हिरो आहेत, असे भाजप नेते नवनाथ बन म्हणाले. या संपूर्ण वादावर 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देताना महेश कोठारे यांनी, 'मी माझे प्रामाणिक मत व्यक्त केले आहे आणि मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे' असे म्हणत राजकारणाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement