Vande Mataram Row: 'शेर के मुंह में खून लग गया है', Abu Azmi यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Continues below advertisement
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी 'वन्दे मातरम्' (Vande Mataram) अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 'ज्याप्रमाणे सिंहाच्या तोंडाला रक्त लागल्यावर तो नेहमी रक्ताचाच शोध घेतो, त्याप्रमाणे हे लोक निवडणुकीत हिंदू-मुस्लिम करून जिंकून येतात', अशा शब्दात आझमींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. मुस्लिम धर्मियांना जाणूनबुजून त्रास देण्यासाठी असे मुद्दे काढले जातात, असा आरोपही त्यांनी केला आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व लोकांनी एकत्र येऊन द्वेष पसरवणाऱ्या लोकांना सत्तेतून खाली खेचले पाहिजे, असे आवाहनही अबू आझमी यांनी केले आहे. अशा फालतू गोष्टी थांबवण्यासाठी या लोकांना हरवणे हाच एकमेव मार्ग असल्याचे ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola