ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 02 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 02 April 2025
वक्फ सुधारणा विधेयकावरची भूमिका शेवटच्या क्षणी ठरवू, संजय राऊतांचं स्पष्टीकरण, विधेयक पारदर्श नाही अशी टीका, तिहेरी तलाक आणि ३७० कलम रद्द करण्याला पाठिंबा दिलाच की असं वक्तव्य..
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध, चर्चेदरम्यान उपस्थित राहून विधेयकाच्या विरोधात मतदान करा अशा आठही खासदारांना सूचना
आत्महत्या केलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजेंना न्याय द्या म्हणत शिक्षकांचं अजित पवारांसमोर आंदोलन, दादांच्या गाड्यांचा ताफा अडवला, तीन आंदोलकांना निवेदन घेऊन येण्याची दादांची सूचना.
बीडमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरताच अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती, चर्चेदरम्यान अपुरी माहिती खपवून घेणार नाही असा इशारा, विमानतळ, रेल्वेलाईन, घरकुलाबाबतची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना..
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या आजच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी, आजारी असल्याने उपस्थित राहणं शक्य नसल्याचं कारण
लोकसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक, दुपारी बारा वाजल्यापासून सुरु होणार आठ तासांची चर्चा, विधेयकाच्या मंंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न..