ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 February 2025

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 February 2025

वोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृहखात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय, अहवालात राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांवर भाष्य, माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर, माझाची एक्स्लुझिव्ह माहिती

महिलांना बसच्या तिकीटदरात ५० टक्के सवलत दिल्यामुळं एसटी महामंडळाला रोज तीन कोटींचा फटका, परिवहन मंत्र्‍यांनीच बोलून दाखवलं वास्तव...यापुढं एसटीत सवलती देणार नाही अशीही घोषणा..

मनोज जरांगेंचा आज मस्साजोग दौरा, देशमुखांच्या कुटुंबीयांशी चर्चा करणार, मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची भेट

अंजली दमानियांनंतर भाजप आमदार सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप...अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया, नॅनो डीेएपीच्या खरेदीचा प्रस्ताव...राजीनामा देण्याची मागणी...

आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान...दोन मिनिटंही नीट बोलणं मुश्कील...ट्विट करत स्वत:च दिली माहिती...

१९९९ ला वाजपेयींचं सरकार एक मतानं पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडला होता, शरद पवारांकडून स्वतःच कबुली, शेवटच्या आठ-दहा मिनिटांत सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केलं असा दावा...

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola