ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 05 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 05 May 2025
भारतीय शक्तिप्रदर्शनानंतर घाबरलेल्या पाकिस्तानची जगभर धावाधाव, अमेरिका, रशिया, तुर्कस्तानसह इस्लामी देशांकडे पसरला पदर, भारताला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना साकडं,
आज सुरक्षा परिषदेची बैठक
भारताने पाकिस्तानचं पुन्हा दाबलं नाक, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे अचानक केले बंद, गाळ उपशाचं दिलं कारण, चिनाब कोरडी झाल्यास पाकिस्तानातील पंजाबची पाणीकोंडी
दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा...तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल...मोठे देश भारतासोबत मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हातमिळवणी...
देशातल्या लोकांना जे हवंय ते नक्की होईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिहांचं पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्नभूमीवर मोठं वक्तव्य, देशाकडे वाकडी नजर करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचा इशारा
घाबरलेल्या पाकिस्तानी संसदेचं आज विशेष अधिवेशन, भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते आज काय मुक्ताफळं उधळणार याकडे लक्ष, इम्रान खानच्या पार्टीचा अधिवेशनावर बहिष्कार
पहलगाम हल्ल्याच्या मुदद्द्यावरून सरकारला पाठिंबा देणाऱ्या पवारांची अडचण वाढू नये म्हणून सर्वपक्षीय बैठकीला दांडी, संजय राऊतांकडून पवारांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर
काँग्रेस रिकामी करा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र, एबीपी माझाच्या हाती बावनकुळेंची ऑडिओ क्लिप