ABP Majha Marathi News Headlines 7 AM Top Headlines 7 AM 8 April 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स
गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा, निष्कर्षानंतर कारवाईसंदर्भात निर्णय होणार
रुग्णालयाची बदनामी थांबावी यासाठी तनिषा भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉ. घैसास यांचा राजीनामा, तर १० लाख मागितल्याचं रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून मान्य
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज सुनावणी, औरंगाबाद खंडपीठात प्रकाश आंबेडकर मांडणार सूर्यवंशी कुटुंबाची बाजू
कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी, एकनाथ शिंदेंवरील विडंबनाप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी
घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला..उज्ज्वला योजनेतील सिलेंडर आता ५५० रुपयांवर...तर बिगर उज्ज्वला योजना सिलेंडर ८५३ रुपयांवर, मध्यरात्रीपासून दरवाढ लागू
केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत २ रुपये प्रतिलिटर वाढ, पेट्रोलियम कंपन्याना झळ बसणार, ग्राहकांवर भार पडणार नसल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण
ट्रम्प टॅरिफ धोरणाचे जगभरात शेअर बाजाराला हादरे, मुंबई शेअर बाजार २ हजार २०० अंशांनी घसरला, गुंतवणूकदारांच्या १६ लाख कोटींचा चुराडा, जपान, हाँगकाँग, ऑस्ट्रेलियाच्या बाजारातही मोठी घसरण






















