ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 01 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 01 April 2025
'खोक्या' प्रकरणात व्हिलन ठरवून आपल्या खुनाचा कट, मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा
संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कळंबमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोन जण ताब्यात, तर महिलेची हत्या झाल्याचा दमानियांचा दावा
संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा प्लॅन होता, गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती, प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याचीही माहिती
मुंबईत मराठीचा अपमान करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या वॉचमनला मनसैनिकांनी लगावली कानशिलात, तर राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची ठाण्यातील बँकेत धडक
मोदी ७५ वर्षांचे होतायत, म्हणून आरएसएसने त्यांना बोलावून घेतलं, खासदार राऊतांचा दावा, भाजपात ७५ वर्षानंतर कोणत्याही पदावर न राहण्याचा नियम असल्याची करुन दिली आठवण
मथुरा आणि काशीच्या आंदोलनात स्वयंसेवक भाग घेऊ शकतात, आरएसएसचे महासचिव दत्तात्रय होसबळेंचं स्पष्टीकरण, सगळ्याच मशिदींवर दावा नको, होसबळेंच्या सूचना