ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 06 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 06 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

राहुल गांधी मुंबईत दाखल, धारावीतल्या चर्मोद्योगासह अन्य लघु उद्योजकांशी साधणार संवाद.. सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त..

औरंगजेबाची भलामण करणाऱ्या अबू आझमीला तूर्तास अटक नाही, पोलिस सुत्रांची माहिती.. एक दोन दिवसांत त्यांना जवाब नोंदवण्यासाठी पाचारण करणार

विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल तर  निवडणूक झाल्यावर थकबाकीसह वीजबिल.. ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचा वीजबिलासह सरकारी आश्वासनाचा पंचनामा

मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांची हत्या करताना हल्लेखोरांचा ग्रुप व्हिडिओ कॉल, तब्बल १२ मिनिटांच्या ग्रुप व्हिडिओ कॉलचे पुरावे सीआयडीच्या आरोपपत्रात

खंडणी आणि हत्या प्रकरणात धनंजय मुुंडेंचा हात असल्याचे पुरावे फडणवीसांकडे.. त्यामुळे धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची मागणी 

शिरुरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजपच्या सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ अंजली दमानियांकडून जारी, सतीश भोसलेकडे असलेली पैशांची बंडले कुणाची? दमानियांचा सवाल एक्सपोस्टद्वारे सवाल 

मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशीचं मत.. घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं सांगून मुंबईची एकच एक भाषा नसल्याचाही दावा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola