ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 09 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 09 April 2025
आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, व्याजदरात कपात झाल्याने गृहकर्जाचा हफ्ता कमी होणार
घरगुती वापराच्या एलपीजीपाठोपाठ आता सीएनजी आणि पाईपगॅसही महागला, सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पाईपगॅसमध्ये एक रुपयांनी वाढ
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता, सुरुवातीला एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज
राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन ठिकाणी कोठड्यांची सिद्धता, मुंबईत आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच कोठडीत राणाला डांबण्याची शक्यता, मुंबईतच खटला चालवण्याचा अंदाज
गर्भवती मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर, महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालाची प्रतीक्षा
दीनानाथ रूग्णालयाला महापालिकेचा दणका, २ दिवसांत २७ कोटींचा मिळकतकर न भरल्यास जप्तीचा इशारा, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोर्टाच्या आदेशानंतर कार्यवाही करु, रुग्णालयाचं स्पष्टीकरण