ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 28 March 2025

शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजेरी, कडेकोट बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात आणणार

 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरुन नाशिक आणि त्र्यंबकेश्ववरच्या महंतांमध्ये वाद, मंत्री गिरीश महाजन साधू-महंतांसोबत चर्चेसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये, दोन्ही नावं लावण्याचा प्रयत्न असल्याची महाजनांची माहिती

 

मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो.. बाळासाहेबांच्या नेतृत्त्वाशिवाय पर्याय नाही हे आता सगळ्यांना कळतंय... उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला, तर तो अधिकृत बॅनर नसल्याचं मनसेचं स्पष्टीकरण

 

दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा, वडिलांच्या वकिलांचा दावा, नार्को टेस्टसाठी वडील तयार, वकिलांची माहिती, उद्धव ठाकरेंचा बोलण्यास नकार

 

 वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला पैसा देऊन थकली, मित्रांसोबतही बोलली; दिशा सालियानने आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद

 

आयकर विभागाने लाभार्थ्यांची माहिती न दिल्यानं लाडक्या बहिणींची पडताळणी रखडली

 

संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यामधील प्रस्तावित स्मारकावरुन शिवसेनेत श्रेयवाद, जागेसाठी राज्यमंत्री योगेश कदमांचे सर्वाधिक प्रयत्न, रामदास कदमांचं वक्तव्य, उदय सामंत आणि रामदास कदमांमध्ये वादाची ठिणगी

 

वाघ्या कुत्रा ही दंतकथा, इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांचा दावा, रायगडावरील वाघ्याची समाधी हटवण्याचीही मागणी तर अभ्यास करुन भूमिका मांडणार, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीची आई-वडिलांकडून निर्घृण हत्या, १५ दिवस उपाशी ठेवून अमानुष छळ, मारहाण करुन दिले अंगावर चटके 

 

कुटुंब संकल्पना नष्ट होत चाललीय, मुलगा आणि आई-वडिलांमधील संपत्तीच्या वादाच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण, देश एक कुटुंब-एक व्यक्तीच्या उंबरठ्यावर असल्याचंही मत

 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील आघाडीच्या दहा श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola