ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 09 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 09 April 2025
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता, सुरुवातीला एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज
राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन ठिकाणी कोठड्या सज्ज, मुंबईत आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच कोठडीत राणाला डांबण्याची शक्यता, मुंबईत चालू शकतो खटला
गर्भवती मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर, महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालाची प्रतीक्षा
दीनानाथ रूग्णालयाला महापालिकेचा दणका, २ दिवसांत २७ कोटींचा मिळकतकर न भरल्यास जप्तीचा इशारा, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोर्टाच्या आदेशानंतर कार्यवाही करु, रुग्णालयाचं स्पष्टीकरण
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात ३५ पैकी १३ आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी, सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन
आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, व्याजदरात कपात झाल्याने गृहकर्जाचा हफ्ता कमी होणार