ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 May 2025
भारतीय सैन्याच्या १५ तळांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावला, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती...भारताच्या एस ४०० यंत्रणेपुढे पाकिस्तानची चिनी बनाटीची यंत्रणा निष्प्रभ...
भारताकडून पाकिस्तानची लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त...भारतीय लष्कराची अधिकृत घोषणा.. लाहोर आणि कराचीचं विमानतळ बंद
ड्रोन हल्ल्यांच्या मालिकेनं पाकिस्तान हादरला...पाकिस्तानच्या अनेक शहरांतली एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडून लक्ष्य...लाहोर, कराची, रावळपिंडीत ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानचा दावा...
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला मोठं यश.. जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा..मुरिदकेमधील हल्ल्यात झाला होता गंभीर जखमी..
ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान १०० दहशतवादी ठार केले, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती, ऑपरेशन अजूनही सुरुच असल्याचं वक्तव्य
पाकिस्तानविरोधातील कारवाईसाठी केंद्र सरकारला सर्वपक्षीय पाठिंबा, पाकिस्तानला ATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची ओवेसींची शिफारस.. ऑपरेशन सिंदूरचं सर्वांकडून समर्थन
३ मे रोजी ऑपरेशन सिंदूरची रणनीती ठरली, ५ मे रोजी पंतप्रधानांकडून हिरवा कंदील, अधिकारी होते क्वॉरंटाईन, ऑपरेशन सिंदूरची इनसाईड स्टोरी माझावर
भारतीय वायुदलाला सरकारची खुली सूट, पाकिस्तानी विमानं आकाशात दिसल्यास तोडीस तोड उत्तर देण्याची मुभा
पाकिस्तानी सरकार आणि दहशतवाद्यांचं साटंलोटं, ऑपरेशन सिंदूरने जगासमोर आणला पाकिस्तानचा खरा चेहरा, दहशतवादी मुदस्सीरला गार्ड ऑफ ऑनर तर दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला सैन्याधिकारी
भारतानं ९ शहरांत ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानचा दावा, लाहोर,रावळपिंडी, कराची, गुजरानवाला आणि अटकमध्ये ड्रोन हल्ले केल्याचा आऱोप
बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानचे १२ सैनिक ठार, बलुचिस्तानातील बोलन दर्रा भागात आयईडी स्फोट, बीएलएच्या स्पेशल टॅक्टिकल स्क्वॉडचा हल्ला
अमृतसरजवळच्या जेठुवाल गावात रात्री पडलं पाकिस्तानी रॉकेट तर गुजरातच्या कच्छमध्ये हायटेन्शन वायरला धडकल्यानं ड्रोनचा स्फोट
एबीपी न्यूजच्या सत्य पत्रकारितेला पाकिस्तान घाबरला, सरकारकडून फेसबुक पेज ब्लॉक, पाकिस्तानी जनतेपर्यंत सत्य पोहोचू नये यासाठी रडीचा डाव
भारताच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये हालचाली वाढल्या, ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धसामग्री आणि रणगाड्यांची जमवाजमव,
सीमावर्ती भागातली पाकमधली गावंही रिकामी
पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार, १५ भारतीयांचा मृत्यू, गोळीबारात हरियाणातील जवान दिनेश कुमार शहीद, सीमेवरून एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया आणि अजितने घ्यावा, मी या प्रक्रियेत नाही, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य...
शरद पवारांच्या वक्तव्याचं दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून स्वागत, कुटुंब एकत्र आलं तर स्वागतच, भुजबळांची प्रतिक्रिया, तर पक्ष मजबूत करण्याकडेच आमचा भर, अनिल देशमुखांचं वक्तव्य
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी आता ३१ जुलैला,
एनआयएच्या विशेष न्यायालयाने मुंबई हायकोर्टाकडे वेळ मागितला, सर्व आऱोपींना ३१ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश