ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 05 May 2025

दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासोबत, पुतीन यांची फोनवरून मोदींना ग्वाही...तर स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ, चीननं दाखले रंग...


भारताने पाकिस्तानचं पुन्हा दाबलं नाक, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे अचानक केले बंद, गाळ उपशाचं दिलं कारण, चिनाब कोरडी झाल्यास पाकिस्तानातील पंजाबची पाणीकोंडी

दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा...तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल...मोठे देश भारतासोबत मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हातमिळवणी...

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा शाहबाज सरकारवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न, सरकारवर लावले भ्रष्टाचार, परिवारवादाचे गंभीर आरोप, पाकिस्तानातल्या विविध संस्थांवर मुनीर यांनी पेरली विश्वासातली माणसं

 सुरक्षा यंत्रणांना देशव्यापी मॉक ड्रील घेण्याचे आदेश... 7 मे ला सर्व राज्यांमध्ये सायरन वाजवण्याच्या गृहमंत्रालयाच्या सूचना

लोकसभेेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला...नव्या सीबीआयच्या संचालकांच्या निवडीसाठी पंतप्रधान कार्यालयात बैठक...

काँग्रेस रिकामी करा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र, काँग्रेस नेत्यांकडून बावनकुळेंच्या वक्तव्याचा समाचार

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला मोठा दिलासा, नव्यानं एफआयआर दाखल करण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, याचिका निकालात
राज्यात बारावीचा एकूण निकाल ९१.८८ टक्के...कोकण विभाग यंदाही अव्वलस्थानी....नेहमीप्रमाणेच मुलींनी मारली बाजी...८९.४६ टक्के घेत लातूरचा निकाल सर्वात कमी...


पहलगाम हल्ल्याचं कंदाहार विमान अपहरणाशी आणखी एक कनेक्शन, जैश ए मोहम्मदचा मुश्ताक अहमद झरगरही हल्ल्याचा मास्टरमाईंड, झरगरच्या अल उमर मुजाहिदीन संघटनेनं दहशतवाद्यांना केली मदत.

दहशतवाद्यांच्या शोधासाठी बैसरन खोऱ्यात जाणाऱ्या ५४ रस्त्यांवर एनआयची नजर, सीआरपीएफ आणि पोलिसांकडून जोरदार शोध मोहीम.

दहशतवाद्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी काश्मीरमधील अनेक संशयित ताब्यात, तपास यंत्रणांकडून ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी.

घातपाताचा कट उधळण्यात भारतीय सैन्याला मोठं यश, पूंछमधून स्फोटकं जप्त, जेवणाच्या डब्यात लपवलं होतं आयईडी, दहशतवाद्यांकडून वापरली जाणारी कम्युनिकेशन डिव्हाईसही जप्त

चिनाबवरच्या बगलिहार प्रकल्पातला गाळ काढला, गाळ काढल्यामुळे धरणातला पाणीसाठा वाढणार, आता वीजनिर्मितीसाठी बगलिहारमध्ये ८४० फुटांपर्यंत पाणीसाठा.

पाककडून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या समोरील भागात गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही तातडीने प्रत्युत्तर

तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा. मोठे देश भारतासोबत मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हातमिळवणी

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि पंतप्रधान मोदी यांची भेट, दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र.

भारत आणि जपान संरक्षणमंत्र्यांची महत्त्वाची द्विपक्षीय बैठक, तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा, राजनाथ सिंह आणि नकटानींची सहा महिन्यांतील ही दुसरी  बैठक.

मलेशियाच्या पंतप्रधानांशी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची चर्चा, पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचं केलं स्पष्ट, पाकिस्तानशी हल्ल्याचा संबंध जोडण्याचा चर्चा फेटाळल्या

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी विलंब, उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांची टीका,राफेल लिहलेलं खेळण्यातलं विमान दाखवून उडवली खिल्ली.

इस्लाम असेपर्यंत दहशतवाद राहणार, प्रसिद्ध बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचं विधान, ((१४०० वर्षे झाली पण इस्लाम सुधारला नाही,)) युरोपात चर्चचं रुपांतर म्युझियम्समध्ये झालं, पण मुस्लिम मशिदी बांधण्यातच गुंग, नसरिम यांचं वक्तव्य.

बाबर आणि औरंगजेबासारखी दोन-चार जण इथं आले आणि त्यांचे आज २० कोटी झाले. बाबा रामदेव यांचं वादग्रस्त वक्तव्य. देशात परदेशी पैसा घेऊन ३ लाखांपेक्षा जास्त मदरसे बनवले, बाबा रामदेव यांचं वक्तव्य. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर. बारावीचा एकूण निकाल ९१.८८ टक्के, मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९४.५८ टक्के.

बारावीचा एकूण निकाल ९१.८८ टक्के, यंदाही कोकण विभागाची बाजी, सर्वाधिक ९६.७४ टक्के निकाल, सर्वात कमी ८९.४६ टक्के लातूर विभागाचा निकाल.

विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.३५ टक्के निकाल,
कला शाखेचा सर्वात कमी ८०.५२ टक्के, तर
वाणिज्य शाखेचे ९२.६८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 
व्यवसाय अभ्यासक्रमाचे ८३.०३ टक्के विद्यार्थी पास, तर आयटीआयचे ८२.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.

बारावीची परीक्षा झालेल्या १२४ केंद्राची चौकशी होणार, चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास १२४ परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार, बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा, परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळल्याने चौकशी

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola