ABP Majha Headlines 8 AM Top Headlines 04 June 2025 एबीपी माझा सकाळी 8 च्या हेडलाईन्स
ABP Majha Headlines 8 AM Top Headlines 04 June 2025 एबीपी माझा सकाळी 8 च्या हेडलाईन्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल २०२५चा नवा विजेता.विराट कोहली आणि आरसीबी चाहत्यांचं १८ वर्षांचं स्वप्न साकार..बंगळुरुकडून पंजाबचा पराभव, विजेतेपदावर पहिल्यांदाच कोरलं नाव
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानची २० नाही २८ ठिकाणं उद्ध्वस्त, पाकच्याच अंतर्गत अहवालात कबुली...एबीपी माझाची exclusive बातमी...पेशावरपर्यंत घुसून भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं...
नरेंदर यांनी सरेंडर केलं, ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका...राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानचे पेड एजंट आहे का, भाजपकडून टीकास्त्र...
भिवंडीत 'शरीयत-ए-अल-शाम' नावाचं छुपं मॉडेल...इस्लामिक राज्य घोषित करुन १५ तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकार...देशविरोधी कृत्यासाठी मुस्लीम तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न...
जिल्हा परिषद शाळांमधे विद्यार्थी पटसंख्या वाढण्यासाठी विशेष उपक्रम...कुटुंबाची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा शिर्डीच्या गणोरे आणि कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावाचा निर्णय...मराठीचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न.
मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य... महाराष्ट्र हितासाठी कुठलाही पक्ष, कोणत्याही नेत्यासोबत एकत्र येण्यास तयार...मनसेकडून टाळी मिळणार का याची प्रतीक्षा...
सोलापूरच्या चिंचोळीत गर्भवतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला...सासरच्यांनी हत्या केल्याचा महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप...आशाराणी भोसलेच्या मृत्यूने खळबळ