ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM: 29 जुलै 2024 : Maharashtra News
अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत केलेला दावा खरा. समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय? राऊतांचा सवाल. तर फडणवीस आणि कदमांच्या भेटीचे राऊतांनी दाखवले फोटो.
महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शरद पवारांना भीती, पुरोगामी विचारांची परंपरा हे महाराष्ट्राचं सुदैव असं मत व्यक्त...
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नीट याचिकांवरील सुनावणीमुळे मागच्या वेळी लांबली होती सुनावणी
ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरेंच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, जमावाकडून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने दखल
मुंबईची पाणीकपात आजपासून मागे, धरणांमध्ये मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध...
पावसाच्या विश्रांतीमुळं कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीमध्ये एका फुटानं घट, सांगलीतही कृष्णेची पातळी ३८ फुटांपर्यंत कमी झाल्याने पुराचा धोका टळला..
पुण्यातील खडकवासला धरणातून २२ हजार क्यूसेकने विसर्ग, तर भिडे पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद