ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

येत्या १५ तारखेला नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार...भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १०  मंत्री शपथ घेण्याची शक्यता...

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा, उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती, अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी यावरुन दोन मतप्रवाह...

केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी अजित पवारांना शऱद पवारांचे पाच खासदार फोडण्याचं टार्गेट...संजय राऊतांचा खळबळजनक दावा...तर महायुतीनं राऊतांना प्रवक्ता म्हणून नेमलंय, अमोल मिटकरींचा हल्लाबोल... 

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय, विश्वगुरू शांत का आहेत, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल...तर मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही, बावनकुळे आणि नवनीत राणांचा पलटवार...

मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचे खासदार राऊतांचे संकेत, मविआसोबत लढण्याची अजून चर्चा नाही, राऊतांचं वक्तव्य, तर राऊत निराशेपोटी एकला चलो रे बोलत असावे, वडेट्टीवारांचा टोला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता, फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी भेट होणार, सूत्रांची माहिती

नेहरूंचं सोडा, तुम्ही काय केलं ते सांगा, पहिल्याच भाषणात प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल...तर संविधानाच्या चर्चेत राजनाथ सिंहांनी नेहरुंचं नाव टाळलं, विरोधकांच्या शेम शेम अशा घोषणा...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram