ABP Majha Headlines 09 AM Top Headlines 24 June 2025 एबीपी माझा सकाळी 09 च्या हेडलाईन्स

१२ दिवसांच्या युद्धानंतर, इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवर सहमती, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडूनही सरकारी टीव्हीवर युद्धबंदी जाहीर

बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी.. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का याकडे लक्ष..

 इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावर साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या वर्षावरील बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर, वर्षा बंगल्यावर आज संध्यकाळी बैठक, भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता

मनसेच्या केंद्रीय समितीची आजही बैठक, बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेणार, काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पर्याय शोधण्याचं काम सुरु

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीरावांचं नावं द्या,, भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी... तर  महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी.. 

पुढील ५ दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता... रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा.. तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधारेचा अंदाज...

मुंबई आणि उपनगरात पावसाची उघडझाप, भिवंडी, नालासोपाऱ्यात सखल भागात पाणी साचलं, मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने

लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंत आणि लोकेश राहुलची खणखणीत शतकं... भारताचं इंग्लंडला ३७१ धावांचं आव्हान... टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांकडून मात्र निराशा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola