ABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
दिल्लीत सुमारे २ तास महायुतीची बैठक, मुख्यमंत्रिपद आणि खातेपाटपाबात शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची अमित शाहांशी चर्चा, लवकरच निर्णय जाहीर करणार..
महाबैठकीतल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण... देवेंद्र फडणवीस, अजितदादांच्या चेहऱ्यावर हास्य तर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी..
दिल्लीनंतर आज मुंबईत महायुतीची बैठक, शिंदे, फडणवीस, अजित पवार राहणार उपस्थित
अर्थखातं अजित पवारांना मिळणार, तर गृहखातं देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती...नव्या सरकारचा शपथविधी २ डिसेंबरला होणार...
शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा...राष्ट्रवादीत तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल,तर सेनेकडून श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता...
अतिआत्मविश्वास काँग्रेसला नडला, उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर केलं असतं तर ५ टक्के मतदान वाढलं असतं, अंबादास दानवेंचा हल्लाबोल...तर चिल्लर गोष्टींत पडायचं नाही, पटोलेंचा पलटवार...
बांगलादेशात इस्कॉनवर बंदी घालायला ढाका कोर्टाचा नकार...इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंसाचार...
प्रदूषणमुक्त प्रवासासाठी आणखी एक पाऊल, भारतात लवकरच हायड्रोजन ट्रेन ट्रॅकवर, आठ डब्यांची ट्रेन ११० किलोमीटर वेगाने धावणार, हरियाणातून सुरुवात