ABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अजित पवार नवखे असल्यामुळे २००४ मध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिलं नाही, शरद पवारांचा गौप्यस्फोट...इतर कुुणाला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, पवारांचा दावा.
अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे पक्षात संधी मिळाली नाही ही अजितदादांची ओरड निरर्थक... शरद पवारांचे खडे बोल...सुप्रिया आणि अजितदादांमध्ये भेद केला नसल्याचं सांगितलं.
पक्ष फुटला नसता तर 2004 मध्ये मीच मुख्यमंत्री झालो असतो... शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया.
मुख्यमंत्रिपदाच्या बैठकीत शिंदेंच्या नावाची चर्चा नव्हती, शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं विधान तर शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं पलटवार
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला भाजप आणि राष्ट्रवादीचा विरोध होता, संजय राऊतांचा दावा, तर खुर्चीच्या अट्टाहासामुळेच ठाकरेंचा शिंदेंना विरोध होता, शिरसाटांचा पलटवार
भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व.
महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान...तयारी पूर्ण...महामुंबईतल्या महामुकाबल्याक़डे सर्वांचं लक्ष.