ABP Majha Headlines : 04 PM : 20 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 04 PM : 20 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.७७ टक्के मतदारांनी बजावला हक्क, दिंडोरीत सर्वाधिक ४५.९५ टक्के मतदान, मात्र ८ राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान सर्वात कमी
पवई हिरानंदानी मतदान केंद्रात ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबलं, ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा संताप, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना थेट आत सोडल्याने तीव्र नाराजी
ईव्हीएम कक्षाला हार घातल्याने शांतिगिरींंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल...त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रप्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सहकुटुंब दादरमध्ये मतदान, तर उद्धव ठाकरेंनी वांद्रे कलानगरमध्ये बजावला हक्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब केलं मतदान...मुंबई महानगर परिसरातल्या सर्वच्या सर्व दहा जागा जिंकण्याचा शिंदेंनी व्यक्त केला विश्वास...
मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान सुरू, ३ मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना, राहुल शेवाळे, संजय दिना पाटील, रविंद्र वायकर, भूषण पाटील यांचं मतदान