Voter List Row: 'बोगस मतदानाविरोधात बॉम्ब फोडणार', Aaditya Thackeray निर्धार मेळाव्यात गौप्यस्फोट करणार.

Continues below advertisement
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत 'निर्धार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात 'आमदार आदित्य ठाकरे हे बोगस मतदानाविरोधात बॉम्ब फोडणार असल्याची' सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत केलेल्या सादरीकरणाच्या धर्तीवर, आदित्य ठाकरे मुंबईच्या मतदार यादीतील घोटाळ्यावर एक तपशीलवार सादरीकरण करणार आहेत. वरळीच्या एनएससीआय डोममध्ये सोमवारी होणाऱ्या या मेळाव्यात, मतदार यादीत कशाप्रकारे घोळ घालण्यात आला आहे हे उघड करून, बनावट मतदान रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत ते पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर मार्गदर्शन करतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola