Bogus Voting: 'मृत व्यक्तीने पुनर्जन्म घेऊन मतदान केलं', Aaditya Thackeray यांचा मतदार यादी घोटाळ्यावर बॉम्ब
Continues below advertisement
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी 'निर्धार मेळाव्या'त बोगस मतदानाच्या (Bogus Voting) मुद्द्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'लोकसभेमध्ये मृत घोषित केलेली व्यक्ती विधानसभेत मतदान करते आणि नंतर पुन्हा यादीतून गायब होते', असा खळबळजनक दावा आदित्य ठाकरे यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याप्रमाणेच पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करत, त्यांनी मतदार याद्यांमधील घोटाळ्यांवर प्रकाश टाकला. वरळी मतदारसंघातील तब्बल १९,३३३ नावं संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये नावांमधील साम्य, लिंग बदल आणि बनावट इपिक नंबर (EPIC number) यांसारख्या अनेक त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी केवळ प्रचार नाही, तर मतदार याद्यांचा अभ्यास अत्यावश्यक असल्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement