1 Minute 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदार संघ : 1 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
1 Minute 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदार संघ : 1 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतदेखील संपुष्टात आली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष असला तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी आहे. लोकसभेला महाराष्ट्रात नरेटीवमुळे आमचं मोठं नुकसान झालं, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं. तसेच, विधानसभा निवडणुकीत महायुतीला किती जागांवर विजय मिळणार हेही भाकीत त्यांनी केलंय. तसेच, एबीपी माझाच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) रामदास आठवलेंसारखं मंत्री व्हायचं झाल्यास मी माझा पक्ष बंद करेन असे म्हटले होते. त्यावर, रामदास आठवलेंनीही पलटवार केला आहे, मी आता मंत्री आहे, राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा, असे आठवले यांनी म्हटले
लोकसभेला आम्हाला झालेलं मतदान हे मोठं आहे. त्यामुळे, महायुतीला विधानसभेला 170 पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. RPI ला एकच जागा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजी होती. मात्र, मी ती दूर केली आहे. विधानसभेला जरी आम्हाला एक जागा असेल तरी आम्हाला एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचं आश्वासन फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्याचे देखील रामदास आठवले यांनी सांगितले.