Ladki Bahin Yojana Fraud : सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ, 2 हजार 652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते

Ladki Bahin Yojana Fraud : सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ, 2 हजार 652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते

राज्य सरकारनं गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. पण सरकारी महिला नोकरदारांनी लाडक्या बहिणींच्या निधीचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. लाभार्थ्यांमध्ये वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील नोकरदार महिला आहेत. २ हजार ६५२ महिला नोकरदारांनी एक दोन नाही तर ९ महिन्यांचे हप्ते घेतल्याचं समोर आलंय. आपात्र असूनही सरकारी महिला नोकरदारांनी योजनेचे तब्बल ३ कोटी ५८ लाख रुपये लाटले. १ लाख ६० हजार ५५९ महिला लाभार्थ्यांच्या पडताळणीत हे वास्तव समोर आलंय. लाभ घेतलेल्या महिला नोकरदारांकडून सरकार ही रक्कम वसूल करणार आहे. ८ लाख ८५ हजार लाडक्या बहि‍णींनी दोन योजनांचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. नमो शेतकरी आणि लाडकी बहीणचा लाभ या सरकारी महिला नोकरदारांनी घेतलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola