Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक
Samarjitsinh Ghatge Join BJP: राज्यात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकीट न मिळाल्यानं भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले कोल्हापूरमधील मातब्बर नेते समरजीत घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांनी आज घरवापसी केली आहे. आज (बुधवारी, ता 8) त्यांनी मुंबईतील भाजप (BJP) मुख्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील, रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा 'कमळ' हाती घेतलं आहे. पक्षप्रवेशानंतर बोलताना समरजीत घाटगे (Samarjitsinh Ghatge) म्हणाले, सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता तुमच्या सगळ्यांचा ऐकून सगळे प्रयोग झालेले आहेत, आता आणि काय प्रयोगाला स्कोप नाहीये, आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरून आता काम करायचं आहे. धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात काम करायचं आहे. पक्षात पुन्हा आणण्याची संधी दिली यासाठी समरजीत घाटगे यांनी भाजपचे आभार मानले आहेत.
Who is Samarjitsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांचा राजकीय परिचय
- समरजितसिंह घाटगे यांनी 2015 साली राजकारणामध्ये भाजपच्या माध्यमातून प्रवेश केला.
- 2018 साली समरजितसिंह घाटगे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
- 2019 साली विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती.
- 2019 साली विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर भाजपमध्ये पुन्हा सक्रिय झाले.
- 2024 साली महायुतीमुळे विधानसभेची जागा हसन मुश्रीफ यांच्या वाट्याला गेली.
- जागा न मिळाल्यानं समरजीतसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली.
- 2024 साली विधानसभा निवडणुकीमध्ये मुश्रीफ यांच्या विरोधात कमी मतांनी पराभव झाला.
- 2024 सालच्या पराभवानंतर काही महिन्यातच हसन मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेतलं.
- कागल नगरपरिषदेबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक एकत्रित लढवली.
- आता पुन्हा समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.