Kolhapur News : कोल्हापुरात आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज
abp majha web team
Updated at:
07 Jun 2023 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur News: कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. त्यांनी आज कोल्हापूर बंदची (Kolhapur Bandh) हाक दिली आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.