Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं

Continues below advertisement

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं 

Kolhapur Asmita Katkar Death Case: कोल्हापुरमधील एक धक्कादायक माहिती (Kolhapur Crime News) समोर आली आहे. एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळल्याने संपूर्ण परिसर हादरवून गेला आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीतील महिलेने काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (Asmita Katkar Death Case) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.

आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आहे. लग्न झाल्यापासून पैशासाठी अस्मिता हिचा छळ केला. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवले आहेत. आता देखील मुलीच्या बारशासाठी 52,000 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे काटकर कुटुंबीयांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे, असा आरोप देखील अस्मिता यांच्या आई वडिलांनी केला आहे. तसेच अस्मिताच्या सासरकडील लोकांनी मुलांचे कपडे घेऊन ठेवले होते. परंतु मुलगी झाल्याने त्यांनी सतत अस्मिताचा छळ केला, असा आरोपही अस्मिताच्या आई-वडिलांनी केला. (Kolhapur News)

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola