OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आंदोलकही आक्रमक झाले असून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करावा, तसेच मृत ओबीसी आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. ॲड. मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी उपोषण सुरू केलं आहे. सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्यांसाठी ओबीसींच्या आरक्षणातून वाटा काढून दिल्याचा आरोप ॲड. मंगेश ससाणे यांनी केला. तसेच जरांगे यांच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, प्रसाद लाड यांनी जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत कोणत्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली, असा सवाल ओबीसी आंदोलक विठ्ठल तळेकर यांनी उपस्थित केला आहे. अंतरवाली सराटीतील ओबीसी आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी बातचीत केली....