Vinod Tawde on Lok Sabha 2024 : PM Narendra Modi वाराणसीतून, 34 केंद्रीय मंत्री पुन्हा मैदानात
Vinod Tawde on Lok Sabha 2024 : PM Narendra Modi वाराणसीतून, 34 केंद्रीय मंत्री पुन्हा मैदानात
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे.