(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Symbol : दोन्ही गटांनी त्रिशूळ आणि उगवता सूर्य चिन्हावर दावा केल्यानं दोन्ही पर्याय बाद ?
Shiv Sena Symbol Crisis : निवडणूक आयोगानं (Election Commission) शिवसेनेचं (Shiv Sena) पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नवीन पर्याय सादर करण्यासाठी आज दुपारी 1 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. अशातच शिंदे गट (CM Eknath Shinde) ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे. चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटानं (Uddhav Thackeray) ज्या चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याच चिन्हांवर आता शिंदे गटानंही दावा केल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटानं निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या तीन पर्यायांमध्ये ठाकरे गटाच्या यादीतील त्रिशुळ आणि उगवता सूर्य या दोन पर्यायांचा सामेवश असल्याची माहिती मिळत आहे. आता दोन्ही गटांकडून सारख्याच चिन्हांची मागणी केल्यामुळे ही दोन्ही चिन्हही आता निवडणूक आयोग बाद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.