Shahi Imam | मुस्लिमांनी घाबरु नये, नागरिकत्व कायद्याचा आपल्याशी संबंध नाही : शाही इमाम | ABP Majha

Continues below advertisement
सुधारित नागरिकत्व कायद्याचा भारतात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिमांशी काही संबंध नाही असं वक्तव्य दिल्लीमधील जामा मस्जिदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन (एनआरसी) सुरु असलेल्या आंदोलनावर बोलताना अद्याप तो कायदा झाला नसल्याची आठवण करुन दिली. धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व कायद्यात आहे. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram