Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक

Continues below advertisement

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीविरोधात गद्दारी केली आहे, त्यामुळे त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) 'सेव्ह डेमॉक्रसी मार्च' दरम्यान राहुल गांधी यांचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला.

आंदोलनाला रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर स्वतः चढत राहुल गांधी यांनी हातात तिरंगा फडकावला. या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून संपूर्ण देश ढवळून निघाला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा लोकशाही वाचवा मोर्चा सुरू आहे...  मोर्चात इंडिया आघाडीचे 19 विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झालेत..   संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत सुमारे 3 किमी पायी हा मोर्चा असेल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणावा, मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे सार्वजनिक करावीत. नावे वगळण्यापूर्वी मतदाराला नोटीस आणि अपील करण्याची संधी मिळावी. आणि ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात. या इंडिया आघाडीच्या प्रमुख मागण्या आहेत.
 महाराष्ट्रातून संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचे खासदार मोर्चात सहभागी झालेत.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola