Vijay Shah remark on Sofia Qureshi | कर्नल सोफिया करेशी पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण - विजय शाह
Vijay Shah remark on Sofia Qureshi | कर्नल सोफिया करेशी पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण - विजय शाह
Opration Sindhoor Sofiya Qureshi: मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विजय शाह यांनी एका जाहीर कार्यक्रमात म्हटले की, ज्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल, असे विजय शाह यांनी म्हटले. विजय शाह यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना मध्य प्रदेशातील भाजप मंत्री विजय शाह यांची जीभ घसरली. विजय शाह यांनी एका कार्यक्रमादरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण असे केलं. त्यामुळे विजय शाहांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. विजय शाहांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आणि मध्य प्रदेश सरकार विजय शाह यांच्यावर कठोर कारवाई करू शकते, असं शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी (Col. Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Wing Commander Vyomika Singh) यांनी सतत पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा बुरखा फाडला होता.