ABP Majha Headlines : 07:00 AM : 15 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

मनसे आणि शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर युतीचा अंतिम निर्णय घेतला जाईल. उद्धव ठाकरेंनी यावर मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे, तर राज ठाकरेंनी सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर एकनाथ शिंदेंनी कानउघडणी केली. 'तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी. कमी बोला, जास्त काम करा,' असा स्पष्ट सल्ला शिंदेंनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज सर्वसाधारण सभा असून, नव्या प्रदेश अध्यक्षाची घोषणा अपेक्षित आहे. शशिकांत शिंदेंची निवड होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा आणि राजीनाम्याचं वृत्त जयंत पाटलांनी फेटाळलं. भाजपकडून कोणतीही विचारणा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक असून, पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्याची रणनीती आखली जाईल. काँग्रेस खासदार राहुल गांधी आज लखनऊच्या एमपी एमएलए कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार आहेत. ड्रॅगन अंतराळ यान दुपारी तीन वाजता कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी उतरेल. इलॉन मस्कची टेस्ला कंपनी आज मुंबईत पहिलं शोरुम उघडणार आहे. मॉडेल वाय सह भारतात पदार्पणाची शक्यता आहे. लॉर्डस् कसोटीत टीम इंडियानं विजयाची संधी गमावली असून, भारताचा बावीस धावांनी पराभव झाला. मालिकेत इंग्लंडची दोन एकनं आघाडी आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola