Maharshi Valmiki Ayodhya Airport : कसं आहे अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळ ?

Continues below advertisement

Maharshi Valmiki Ayodhya Airport  : कसं आहे अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळ ?  हे भगवान रामाच्या चित्रे आणि कलाकृतींनी सजवलेले आहे. टर्मिनल इमारतीचे संपूर्ण संकुल अनेक सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, एलईडी लाईट आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची विशेष काळजी घेण्यात आली आहे.विमानतळामुळे अयोध्येतील संपर्क सुधारेल, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे स्थानिक लोकांना पर्यटन, व्यावसायिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधींचा मोठा फायदा होणार आहे. विमानतळाच्या आजूबाजूचा परिसरही मोठ्या प्रमाणात विकसित केला जात आहे.Ayodhya त्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे.सीएम योगींनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली22 जानेवारी 2024 रोजी राम लल्लाचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत. सीएम योगी अयोध्येत सुरू असलेल्या बांधकामांवर थेट लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री योगी यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेतला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram