Satish Dhage on Rauf Asghar Dead : मोठी बातमी! दहशतवादी रौफ असगरचा खात्मा, ऑपरेशन सिंदूरचं सर्वात मोठं यश!

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जैशचा मोरक्या मसूद अझहरचा (Masood Azhar)  दहशतवादी भाऊ रौफ असगरचा (Rauf Asghar)  खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूमध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात अजगर गंभीर रित्या जखमी झाला होता. दरम्यान 1999 सालच्या कंधार विमान अपहरणात रौफ असगरचा प्रामुख्याने सहभाग होता. ऑपरेशन सिंदूरच्या सर्जिकल स्ट्राइक हल्ल्यात तो गंभीरित्या जखमी झाला होता. त्यामुळे भारतीय सैन्यांना राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताला एक मोठं यश हाती आलं असल्याचे बोलले जात आहे. 

एकीकडे मौलाना मसूद अझर यांच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झाल्याने जैश ही दहशतवादी संघटना पूर्णतः बिथरली होती. अशातच जैशचा मोरक्या मसूद असगरचा दहशतवादी भाऊ रौफ अजगरचा खात्मा झाल्याने दहशतवाद्यांना आणि दहशतवाद पोसणाऱ्यांना एक फार मोठा धक्का बसला आहे. मुरिदकेमध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात तो काल जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान भारतीय वायुदलाना एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर सटीक वार करत शंभरहून अधिक दहशतवादी ठार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता जैशचा मोरक्या मसूद अजगर दहशतवादी भाऊ आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड  रौफ अजगरचा खात्मा झाल्याने भारतीय सैन्य दलाला मोठे यश मिळाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola