Dharma Sansad Controversy : धर्म संसदेतील वादग्रस्त वक्तव्यांवर कारवाई केली? कोर्टाची विचारणा
दिल्ली आणि उत्तराखंडमधल्या धर्मसंसदेत द्वेष पसरवणारी भाषणं केल्याप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही राज्यांना केलीय. गेल्या वर्षी दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या धर्मसंसदेत भडकाऊ भाषणं करण्यात आल्यानं वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा कोर्टानं दिल्ली आणि उत्तराखंड न्यायालयाला नोटीस पाठवून पोलिसांनी या प्रकरणांत काय कारवाई केली याची विचारणा केलीय.