BR Gavai take oath as Chief Justice : न्यायमूर्ती भूषण गवईंची सरन्यायाधीश म्हणून शपथ

BR Gavai take oath as Chief Justice : न्यायमूर्ती भूषण गवईंची सरन्यायाधीश म्हणून शपथ 
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना काल निवृत्त झाले.  आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ आजपासून २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत म्हणजेच सहा महिने दहा दिवसांचा असणार आहे. 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 

२२ दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असलेले बीएसएफचे जवान पीके साहू भारतात सुखरूप परत, अटारी वाघा सीमेवरुन साहू मायदेशात 

भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या ११ एअरबेसच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचिराख, उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाईटनं टिपलेले फोटो समोर, पाकिस्तानकडूनही कबुली 

भारतानं उद्ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तान पुन्हा बांधून देणार, जैशचं मुख्यालय,लश्कर आणि हिजबुलचे अड्डे पुन्हा उभारणार, ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना एकेक कोटींची मदत.. 

मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शाहांनी मागितली माफी, मोदींनी नारीशक्तीचं प्रतीक म्हणून उभं केलेल्या सोफिया कुरेशींना म्हणाले होते दहशतवाद्यांची बहिण, टीका झाल्यावर म्हणतायत सोफिया माझी सख्खी बहिण... 

ऑपरेशन सिंदूरचंं यश साजरं करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅली, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेत सहभागी तर मुंबईत मुख्यमंत्र्यासह भाजप नेते सहभागी होणार... 

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही, कालच्या बैठकीत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती, गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी सूतोवाच केल्याचंही वक्तव्य..

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola