चीननं अरुणाचल प्रदेशमधल्या 17 वर्षीय युवकाचं अपहरण, खासदार तापिर गाओ यांचा आरोप
Continues below advertisement
सीमेवर नेहमीच कुरापती करणाऱ्या चीनवर अरुणाचल प्रदेशातील खासदारांनी गंभीर आरोप लावलेत. अरुणाचल प्रदेशातील १७ वर्षीय युवकाचं अपहरण केल्याचा आरोप खासदार तापिर गाओ यांनी केलाय. चीनच्या सैनिकांनी सिंयुगलातल्या लुंगता परिसरातून दोन मुलांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक जण चिनी सैनिकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यात यशस्वी झाला आणि त्यामुळंच चीनच्या या कटाचा पर्दाफाश झाल्याची माहिती खासदार तापिर गाओंनी दिलीय. दरम्यान अल्पवयीन मुलाचं अपहरण नेमकं का करण्यात आलंय.. तो सध्या सुरक्षित आहे की नाही याचा स्थानिक पोलीस तपास करताहेत. तसंच या संपू्र्ण प्रकरणासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
Continues below advertisement