Operation Sindoor | राष्ट्रपती Droupadi Murmu यांनी केलं तीनही सैन्यदलांच्या कामगिरीचं कौतुक

Operation Sindoor update | ऑपरेशन सिंदूरची विस्तृत माहिती राष्ट्रपतींकडे सादर, तीनही सैन्यदल कामगिरीचं कौतुक
राष्ट्रपती मुर्मूंसह तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांची बैठक  सीडीएस अनिल चौहान यांनी दिली राष्ट्रपतींना विस्तृत माहिती  ऑपरेशन सिंदूरची विस्तृत माहिती राष्ट्रपतींकडे सादर  लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी.सिंग, नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंची भेट घेतली.  तीनही सैन्यदलांच्या कामगिरीचं राष्ट्रपतींकडून कौतुक

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही, कालच्या बैठकीत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती, गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी सूतोवाच केल्याचंही वक्तव्य.. 
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची बैठक, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना...जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष  
जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळांसह सचिन अहिर शरद पवारांच्या भेटीला, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच मविआ नेत्यांच्या गाठीभेटी 
 माझ्या समस्या प्रश्न ठाकरेंसमोर मांडल्या, उत्तराची अपेक्षा, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया, गद्दारी केली नसल्याचाही दावा 
ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओढ, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्सीखेच

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola