Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

Continues below advertisement

ABP Majha LIVE : हिंगोलीत लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ओबीसींच्या हक्काच्या जागांवर मराठा-कुणबी दाखले दिले जात असल्याचा दावा करत त्यांनी मराठा समाजाला EWS आणि SEBCमधून आरक्षण द्यावं, मात्र ओबीसी आरक्षणात समावेश करू नये, अशी मागणी केली. दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यापासून मोर्चा काढून हजारो वाहनांसह मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं हाके यांनी सांगितलं. कायदा मोडल्यास जेलमध्ये टाका, पण आंदोलन आझाद मैदानातच होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा-ओबीसी संघर्षासाठी सरकारमधील काही मंत्री आणि आमदार जबाबदार असल्याचा आरोपही हाके यांनी केला. मनोज जरांगेंना वेळोवेळी रेड कार्पेट टाकणाऱ्या आणि त्याचे हातपाय दाबणाऱ्या मनोज दादा म्हणून लाळ घोटणाऱ्या अनेक मंत्री आणि अनेक आमदार या लोकांनी ज्या मनोज जरांगेंचं लाड केलं सरकारमधले मंत्री आणि आमदार यांनी महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण बिघडवलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola