Anil Patange NCP : हिंगोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, अनिल पतंगे शरद पवारांची साथ सोडणार
Anil Patange NCP : हिंगोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, अनिल पतंगे शरद पवारांची साथ सोडणार
हिंगोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ
अनिल पतंगे समर्थकांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
आठ जूनला अजित पवार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
हिंगोलीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले अनिल पतंगे हे शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. आठ जूनला अजित पवार या पक्षप्रवेशा सोहळ्यासाठी खास हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत सेनगाव येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमांमध्ये सेनगाव नगरपंचायत चे नगराध्यक्ष यांच्यासह अनेक नगरसेवक आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी असे सर्वजण शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.