Gondia farmers : गोंदियामध्ये मका पीक वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, अवकाळीची धास्ती
गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने उसंत घेतली आहे. मात्र मोरगाव अर्जुनी तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा प्रचंड फटका बसला आहे. अवकाळी पाऊस थांबला असला तरी मात्र आता मका पिकाला वाळविण्याकरिता शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळत आहे. शेतातील बांधावर पाणी साचले असल्याने रस्त्यावर शेतकरी मका पीक वाळवितांना दिसत आहेत.
Tags :
Gondia Farmers Unseasonal Rain Waterlogged Since 4 Days Incessant Rain Arjuni Maize Growers Fields